बर्मिगहॅम : जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनने शुक्रवारी ऑल इंग्लंड बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. चीनच्या लू गुआंग झू याने उपांत्यपूर्व फेरीतून माघार घेतल्याने लक्ष्यला पुढे चाल देण्यात आली आहे.

लक्ष्यने जानेवारीत इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते आणि गेल्या आठवडय़ात त्याने जर्मन खुल्या स्पर्धेतदेखील उपविजेतेपद पटकावले होते. आता मलेशियाचा सहावा मानांकित ली झि जिया आणि जपानचा दुसरा मानांकित केंटो मोमोटा यांच्यातील विजेत्याशी लक्ष्यची उपांत्य लढत होईल.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

लक्ष्यने गुरुवारी दोन वेळा जागतिक विजेत्या आणि जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावरील डेन्मार्कच्या आंद्रेस अँटनसेनवर २१-१६, २१-१८ असा धक्कादायक विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गेल्या आठवडय़ात लक्ष्यने डेन्मार्कच्या ऑलिम्पिक विजेत्या आणि क्रमवारीत अग्रस्थानावरील व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला नमवण्याचा पराक्रम दाखवला होता.

दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूची गुरुवारी महिला एकेरीतील वाटचाल खंडित झाली. जपानच्या सयाका ताकाहाशीने सिंधूला २१-१९, १६-२१, २१-१७ असे पराभूत केले. सयाकाने पहिला गेम २१-१९ असा जिंकत आघाडी घेतली. मग सिंधूने दुसरा गेम २१-१६ असा जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर सयाकाने तिसरा गेम २१-१७ असा जिंकत सामना जिंकला.

ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनेही महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. ट्रीसा-गायत्रीने कोरियाच्या द्वितीय मानांकित ली सोही आणि शिन सेऊंगश्ॉन जोडीवर खळबळजनक विजयाची नोंद केली. जागतिक क्रमवारीत ४६व्या क्रमांकावरील ट्रीसा-गायत्री जोडीने एक तास आणि सात मिनिटे चाललेल्या लढतीनंतर कोरियाच्या जोडीला १४-२१, २२-२०, २१-१५ असे नामोहरम केले.

सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात

पाचव्या मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेडडी आणि चिराग शेट्टी जोडीचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित मार्कस फर्नालडी गिडेओन आणि केविन संजया सुकामुलजो जोडीकडून २२-२४, १७-२१ अशी सात्त्विक-चिराग जोडीने ४७ मिनिटांत हार पत्करली.