Gautam Gambhir statement on foreign coach video viral : भारतीय क्रिकेट संघाला नवा गोलंदाजी प्रशिक्षकही मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलला टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. मॉर्केल हे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची निवड असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच गौतम गंभीरचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो परदेशी प्रशिक्षकाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित करत आहे.
‘भारतीय संघाचा प्रशिक्षक भारतीयच असावा’ –
बीसीसीआयने बुधवारी मॉर्ने मॉर्केलची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली. मॉर्केलचे नाव निश्चित झाल्यानंतर २०२२ मधील गौतम गंभीरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर म्हणत आहे की, ‘भारतीय संघाचा प्रशिक्षक भारतीयच असावा. हा भावनांचा विषय आहे. परदेशी प्रशिक्षक, ज्यांना इथे खूप महत्त्व दिले जाते, ते फक्त पैसे कमवण्यासाठी इथे येतात. पण एक चांगली गोष्ट घडू शकली असती आणि जी गेल्या सहा वर्षांत घडली आहे. ती म्हणजे आता फक्त भारतीय खेळाडूंनाच प्रशिक्षक बनवले जात आहे. आशा आहे की हा ट्रेंड कायम राहील.’
या तिघांनीही गौतम गंभीरसोबत आयपीएलमध्ये केले आहे काम –
गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक बनल्यानंतर कोचिंग स्टाफमधील अनेक सदस्य बदलले आहेत. अभिषेक नायर आणि रायन टेन डोस्चेट आधीच टीम इंडियामध्ये सामील झाले होते. आता मॉर्ने मॉर्केलचे नावही फायनल झाले आहे. विशेष म्हणजे अभिषेक नायर, रायन टेन डोशेट आणि मॉर्ने मॉर्केल यांनी याआधी गौतमसोबत आयपीएलमध्ये काम केले आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2024 : रोहित-विराट दुलीप ट्रॉफीमध्ये का खेळणार नाहीत? जय शाह यांनी सांगितले खरे कारण
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केलची पहिली मालिका –
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही मालिका मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पहिली असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये खेळवली जाईल.