scorecardresearch

भारतीय संघातील क्रिकेटपटूने स्वत:च्याच बर्थ डे पार्टीत प्रेयसीला केलं प्रपोज; Marry Me म्हणत साखरपुडाही उरकला

गुरुवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी त्याचा २८ वा वाढदिवस होता. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतच त्याने तिला प्रपोज केलं.

Axar Patel Engagement
त्यानेच इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत दिली माहिती

भारताचा डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने आपल्या प्रेयसीसोबत साखरपुडा केलाय. अक्षरने स्वत: इन्स्टाग्रामवरुन प्रेयसी मेहासोबतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदवार्ता दिलीय.

गुरुवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी अक्षरचा २८ वा वाढदिवस होता. त्यामुळेच त्याने साखरपुड्यासाठी हाच मुहूर्त निवडला. अक्षरने इन्स्टाग्रामवर या सोहळ्याचे चार फोटो शेअऱ केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांबरोबरच अक्षरचे भारतीय क्रिकेट संघातील सहकारी सुद्धा त्याला शुभेच्छा देत असल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे.

अक्षरने मेहासोबतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना सुंदर कॅप्शन लिहिली आहे. “ही आयुष्याची नवीन सुरुवात आहे. आम्ही आता कायमचे एक झालो आहोत. मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन असा शब्द देतो,” अशी कॅप्शन अक्षरने दिलीय. अक्षरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो प्रेयसी मेहासोबत दिसत असून ते एकमेकांना अंगठ्या घालताना दिसत आहेत. अक्षरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानच मेहाला प्रपोज करुन रिंग सेरिमनी करण्यासंदर्भातील नियोजन केलं होतं. अक्षरच्या फोटोंवरुन तर हे मेहासाठीसुद्धा सप्राइज होतं असं वाटतंय.

या फोटोंमध्ये अक्षर आणि मेहा एकमेकांना रिंग घालत असताना मागे मॅरी मी म्हणजेच माझ्याशी लग्न कर असा मजूर असलेला बोर्ड दिसत आहे. म्हणजेच अक्षरने मेहाला सप्राइज देण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं.

अक्षरने हे फोटो शेअर केल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. यामध्ये ऋषभ पंत, उमेश यादव आणि ईशान किशनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. जयदेव उनाडकटने गुजराती भाषेत अक्षरला शुभेच्छा दिल्यात.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All rounder axar patel engagement with fiance meha on 28th birthday scsg

ताज्या बातम्या