Aman Sehrawat Creates History: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्तीतही भारताने पहिले पदक जिंकत खाते अखेर उघडले आहे. भारताचा २१ वर्षीय तरूण पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावतने शुक्रवारी ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील देशाचे हे सहावे पदक आहे. अमनने कुस्तीमध्ये अमनने आक्रमक खेळी करत कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझचा तब्बल १३-५ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यासह त्याने एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Paris Olympics 2024: २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा ठेवली कायम

२१ व्या वर्षी पदक जिंकत अमन सेहरावतची ऐतिहासिक कामगिरी

भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. अमनने २१ वर्षे आणि २४ दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे. गुरुवारी उपांत्य फेरीत अमनला जपानच्या रे युगाचीकडून पराभव पत्करावा लागला होता. ज्याने ५७ किलो वजनी गटात यंदा सुवर्णपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत अमनचा सामना पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूशी झाला. अमनने प्रतिस्पर्ध्याचा १२-५ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला अमनला एकही गुण मिळाला नाही. डॅरेंटोने पहिला गुण मिळवल्यानंतर दोघांमध्ये काही काळ एका गुणासाठी चुरशीची लढत झाली. अमनने ब्रेक मारून आघाडी घेतली.

हेही वाचा –Aman Sehrawat: अमन सेहरावतची दुर्दम्य कहाणी; लहानपणीच आईबाबांना गमावलं, सुशील कुमार ठरला प्रेरणादायी

अमनने यानंतर अधिक आक्रमक खेळ केला. अमन त्याच्या आक्रमक खेळासाठी ही ओळखला जातो, त्याने आपली चढाई चालू ठेवली आणि खेळाडूला ऑरेंज रिंगकडे नेऊन पुन्हा पुन्हा गुण मिळवले. यानंतर अमनने हा सामना १३-५ असा जिंकला. अमनचे हे पदक पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे सहावे पदक आहे. भारतातून ६ कुस्तीपटूंचा संघ पॅरिसला गेला होता. या संघात अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता.

गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहियाने ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. यावर्षी झालेल्या चाचण्यांमध्ये अमनने रवी दहियाला मागे टाकत ५७ किलो वजनी गटात ऑलिम्पिकसाठी निवड झाली. त्याने आशियाई पात्रता फेरीत जाऊन कोटा मिळवला. निवड चाचणी घेण्यात आली नाही आणि अमन सेहरावतला थेट पॅरिसला पाठवण्यात आले.

हेही वाचा – Sachin Tendulkar: “हे खेळभावनेच्या विरूद्ध आहे, तिने…” विनेशच्या पदकासाठी मास्टर ब्लास्टर सरसावला, म्हणाला ‘अंपायर्स कॉल असायला हवा’

भारताच्या कुस्तीपटूंची ऑलिम्पिक पदकांची परंपरा

खाशाबा जाधव १९५२ कांस्य (५७ किलो)

सुशील कुमार २००८ कांस्य (६६ किलो)

सुशील कुमार २०१२ रौप्य (६६ किलो)

योगेश्वर दत्त २०१२ कांस्य (६० किलो)

साक्षी मलिक २०१२ कांस्य (५८ किलो)

रवी दहिया २०२१ रौप्य (५७ किलो)

बजरंग पुनिया २०२१ कांस्य (६५ किलो)

अमन सेहरावत २०२४ कांस्य (५७ किलो)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aman sehrawat becomes indias youngest olympic medalist with bronze medal in paris olympics 2024 in 57 kg freestyle wrestling bdg
Show comments