हॅमिल्टन अमेरिकन ग्रां.प्रि.चा विजेता

या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिबॅस्टिन वेटेलला नमवत मॅकलरेनच्या लुईस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्रि. वर कब्जा केला. या फॉम्र्युला वन जेतेपदासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा वेटेलचा निर्धार होता.

या वर्षीच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिबॅस्टिन वेटेलला नमवत मॅकलरेनच्या लुईस हॅमिल्टनने अमेरिकन ग्रां. प्रि. वर कब्जा केला.
या फॉम्र्युला वन जेतेपदासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा वेटेलचा निर्धार होता. मात्र हॅमिल्टनच्या विजयाने वेटेलचे स्वप्न भंगले. हॅमिल्टन आणि वेटेल यांच्यातील अव्वलस्थानाची चुरस शिगेला पोहचली आहे.
वर्षांतील शेवटच्या अर्थात ब्राझीलियन ग्रां. प्रि. द्वारे आता ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपचा फैसला होणार आहे.
दुसऱ्या स्थानापासून स्पर्धेला सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने ४२ व्या फेरीत वेटेलला मागे टाकले आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब करीत कारकीर्दीतील २१व्या जेतेपदाला गवसणी घातली. सलग तिसऱ्या हंगामात कन्स्ट्रक्र्ट्स चॅम्पियनशिप रेड बुलला मिळवून देण्यात वेटेलला अपयश आले. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने तिसरे स्थान पटकावले.
ब्राझीलियन ग्रां. प्रि. जिंकत मॅकलरेनला अलविदा करण्यासाठी हॅमिल्टन उत्सुक आहे.     

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: American grandprix hamilton winner

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या