राज्यातील राजकीय वातावरण तापले आहेत. त्यात आता मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणुकीला ( एमसीए ) नवे वळण आले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे हे पवार-शेलार गटाकडून अध्यपदाचे उमेदवार असतील.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारांनी एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पवार-शेलार गटाकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळांच्या खजिनदारपदी आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेलार यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. शेलार यांच्याविरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

हेही वाचा – आगामी काळात भारतीय संघाचा भरगच्च कार्यक्रम, कसे असतील दौरे जाणून घ्या

दरम्यान, अमोल माळी यांच्यासाठी आशिष शेलारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पवार यांच्याच संमतीने शेलारांनी एमसीए अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटर्तीय अमोल काळेंच्या नावाची घोषणा केली आहे.