भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने १२ व्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अशी कामगिरी करणारी निखत पाचवी भारतीय महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. या यशानंतर निखतवर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील निखतच्या या कामगिरीची दखल घेत खास ट्विट करत तिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा >> IPL 2022 RR vs CSK : दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी राजस्थान करणार प्रयत्न, आज चेन्नईसोबत लढत; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर ते आपले मत उत्स्फूर्तपणे मांडत असतात. निखत झरीनने १२ व्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी तिचे अभिनंदन केले आहे. “भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीने ५-० ने विजय मिळवला. तू कोण आहेस तसेच भारत देश काय आहे, हे तू जगाला दाखवून दिलंस. तुझे आभार,” असे म्हणत आनंद महिंद्र यांनी निखत झरीनचे कौतुक केले.

हेही वाचा >> जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील निखतच्या या यशाची दखल घेत तिचे अभिनंदन केले. “आपल्या बॉक्सिंगपटूंनी आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी केलेली आहे. जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे निखत झरीनचे अभिनंदन. तसेच मनिषा मौऊन आणि परवीन हुडा यांनी कांस्यपदक मिळवले. त्यांचेदेखील अभिनंदन,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हेही वाचा >> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

दरम्यान, महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारी निखत झरीन भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. गुरुवारी झालेल्या ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा ५-० असा पराभव केला. एमसी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांच्यानंतर जगज्जेती म्हणून मिरवण्याचा मान निखत झरीनने मिळवला आहे.