Anil Kumble Disclosure about Rohit MI Captaincy: रोहित शर्मा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने एकूण ५ आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. रोहित शर्मा २०१३ पासून मुंबईची धुरा सांभाळत आहेत. पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार का करण्यात आले होते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळेने याबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. रोहित शर्माला फ्रँचायझीचा कर्णधार कसा आणि का करण्यात आला हे त्याने सांगितले.

२०१३ मध्ये अनिल कुंबळे मुंबई इंडियन्सचा मेंटॉर होता. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ३ वर्षे खेळला होता. त्यावेळी जॉन राइट हे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. अनिल कुंबळेने जिओ सिनेमावर ही रंजक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “आम्ही आयपीएल २०१३ मध्ये ४-५ सामने गमावले होते. मी आणि जॉन राईटने रोहित शर्माला विचारले होते की, तू मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करशील का? त्याला उत्तर देताना रोहित म्हणाला की, तो संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे.”

Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष
Rohit Sharma gifted special 200 jersey by Sachin Tendulkar
IPL 2024 : रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास! सचिन तेंडुलकरकडून मिळालं खास गिफ्ट
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात चाहते एकमेकांशी भिडले, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

कुंबळे पुढे म्हणाले, “यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही. कर्णधार म्हणून तो शानदार कामगिरी केली. त्याने आतापर्यंत सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.” रोहित शर्मापूर्वी रिकी पाँटिंग संघाचे नेतृत्व करत होता. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी चांगली होत नव्हती. त्यामुळे संघाचा कर्णधार बदलण्यात आला.

२०१३ मध्ये मुंबईने पहिले विजेतेपद पटकावले –

२०१३ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीला रिकी पाँटिंगला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र सलग सामने गमावल्यानंतर पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर रोहितने प्रथमच मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच जेतेपदे जिंकली आहेत.

हेही वाचा – WPL 2023 MI vs UPW: यास्तिका भाटियाला सूर्यकुमारसारखा शॉट खेळणे पडले महागात, अंजलीने केले क्लीन बोल्ड

रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सचा भाग –

विशेष म्हणजे, त्याच्या कर्णधारपदाच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०११ पासून, रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. रोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २२७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३०.३ च्या सरासरीने आणि १२९.८९च्या स्ट्राइक रेटने ५८७९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत.