अंजनाला राज्य शासनाकडून पाच लाखांचे इनाम घोषित

आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी धावपटू अंजना ठमके हिला राज्य शासनाकडून पाच लाख रूपये इनाम देण्यात येणार

आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी धावपटू अंजना ठमके हिला राज्य शासनाकडून पाच लाख रूपये इनाम देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी दिली. आदिवासी विकास भवनात शुक्रवारी पिचड यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी तिचा आदिवासी विकास विभागातर्फे सत्कार होणार आहे, यावेळी तिला प्रोत्साहनपर निधीचा धनादेश दिला जाईल, असे पिचड यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anjana gets five lakhs award from state government