भारताच्या श्रीजेश व हरमनप्रीतला नामांकने

लखनौ येथे मागील वर्षी झालेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पध्रेत हरमनप्रीतने लक्षणीय कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम उद्या

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (एफआयएच) वार्षिक पुरस्कार कार्यक्रम २३ फेब्रुवारीला चंदीगढ येथे शानदार पद्धतीने होत असून, भारताच्या पुरुष संघाचा प्रेरणादायी संघनायक पी. आर. श्रीजेश व वेगाने उदयास आलेला ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग हे दोघे अनुक्रमे वर्षांतील सर्वोत्तम गोलरक्षक आणि सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू या पुरस्कारांसाठी शर्यतीत आहेत.

हे पुरस्कार वितरण प्रथमच औपचारिक कार्यक्रमात होत असून, २०१६ या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू, गोलरक्षक, उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना या वेळी गौरवण्यात येणार आहे.

श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स करंडक स्पध्रेचे रौप्यपदक जिंकले होते. याचप्रमाणे लखनौ येथे मागील वर्षी झालेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पध्रेत हरमनप्रीतने लक्षणीय कामगिरी केली होती. हा संपूर्ण कार्यक्रम ‘एफआयएच’च्या यू-टय़ूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी दिली.

वार्षिक पुरस्कारांची नामांकन यादी

  • सर्वोत्तम खेळाडू – पुरुष : गोन्झालो पिलॅट (अर्जेटिना), जॉन-जॉन डोहमन (बेल्जियम), मॉरित्झ फुस्र्ते (जर्मनी), प्रेडो इबारा (अर्जेटिना), टॉबियास हॉके (जर्मनी); महिला : अ‍ॅलेक्स डॅनसन, कॅट रिचर्ड्सन-वॉल्श (ग्रेट ब्रिटन), कार्ला रेबेच्ची (अर्जेटिना), नाओमी व्हॅन अ‍ॅस (नेदरलँड्स), स्टॅके मिकेलसेन (न्यूझीलंड).
  • सर्वोत्तम गोलरक्षक – पुरुष : डेव्हिड हार्टे (आर्यलड), जाप स्टॉकमॅन (नेदरलँड्स), ज्युआन व्हिवाल्डी (अर्जेटिना), पी. आर. श्रीजेश (भारत), व्हिन्सेंट व्हॅनॅश (बेल्जियम); महिला : बेलेन सुशी (अर्जेटिना), जॅकी ब्रिग्स (अमेरिका), जॉयसे सॉमब्रोइक (नेदरलँड्स), क्रिस्तिना रेनॉल्ड्स (जर्मनी), मॅडी हिंच (गेट्र ब्रिटन)
  • सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (२३ वर्षांखालील) : पुरुष : आर्थर व्हान डोरेन (बेल्जियम), ख्रिस्तोफर रूर (जर्मनी), हरमनप्रीत सिंग (भारत), जॉरिट क्रून (नेदरलँड्स), टिम हर्झब्रेश (जर्मनी); महिला : फ्लोरेन्सिया हबिफ (अर्जेटिना), कॅथरिन स्लॅटरी (ऑस्ट्रेलिया), लिली ओस्ले (ग्रेट ब्रिटन), मारिया ग्रॅनॅटो (अर्जेटिना), नायके लॉरेन्झ (जर्मनी).
  • सर्वोत्तम प्रशिक्षक – पुरुष : कार्लोस रेटेग्यू (अर्जेटिना), डॅनी केरी (ग्रेट ब्रिटन), शेन मॅकलीऑड (न्यूझीलंड); महिला : अ‍ॅलायसन अ‍ॅनन (ऑस्ट्रेलिया), जॅनीके स्कॉपमन (अमेरिका), कॅरेन ब्राऊन (गेट्र ब्रिटन)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Annual award of the international hockey federation

ताज्या बातम्या