scorecardresearch

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑक्टोबरला ; ‘आयसीसी’ परिषदेसाठी भारताचा प्रतिनिधी निश्चित होणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) भारताचा प्रतिनिधीसुद्धा याच सभेत निवडणुकीद्वारे ठरणार आहे.

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑक्टोबरला ; ‘आयसीसी’ परिषदेसाठी भारताचा प्रतिनिधी निश्चित होणार
बीसीसीआय

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभा १८ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे, अशी माहिती सचिव जय शहा यांनी दिली.

या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत महिला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हा एक महत्त्वाचा विषय असेल. याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणूक होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) भारताचा प्रतिनिधीसुद्धा याच सभेत निवडणुकीद्वारे ठरणार आहे. अध्यक्षपदासाठी ७७ वर्षीय क्रिकेट संघटक एन. श्रीनिवासन ५० वर्षीय विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. एकंदर

२९ मुद्दय़ांचा कार्यक्रमपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे, असे राज्य संघटनांना ‘बीसीसीआय’ने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेद्वारे कार्यकारिणी समितीवर स्थान मिळवणाऱ्या एक पुरुष आणि एक महिला अशा दोन जागांसाठीही निवडणूक यावेळी होईल. याचप्रमाणे सर्व स्थायी समित्या, क्रिकेट समिती आणि पंचांच्या समितीचीसुद्धा निवड बैठकीत होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या