scorecardresearch

IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम

सूर्यकुमार यादव याने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या १००० धावाही पूर्ण केल्या आहेत.

IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात सुर्यकुमार यादवचे रौद्ररूप पाहायला मिळाले. जणू काही काल गुवाहाटीमध्ये सुर्यकुमार यादवची त्सुनामी आली होती. त्याने त्याचा फॉर्म पुढे सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केले. जवळपास निम्यापेक्षा कमी चेंडूत त्याने ते पूर्ण केले. अवघ्या २२ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीचा फायदा संघाला विजय मिळवण्यासाठी झालाच, पण त्याच्या नावावर एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला आहे.

सूर्यकुमार यादवने या सामन्यात ६१ धावा केल्या त्याच्या या खेळीला ५ चौकार आणि ५ षटकारांचा साज होता. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या १०००  धावाही पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत स्वतःच्या १००० टी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ५७३ चेंडूत आणि ४० च्या सरासरीने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियान दिग्गज ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर होता. मॅक्सवेलने ६०३ चेंडूत १००० टी२० धावा केल्या होत्या. आता मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा : IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, श्रेयस उपकर्णधार  

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या सहा षटकात आक्रमक सुरूवात करून दिली. त्याने ३७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यानंतर एडन मार्करम दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचत केएल राहुलचे अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत ५७ धावा केल्या. अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. त्याने या सामन्यात देखील सूर्यकुमारच्या साधीने २८ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या.

हेही वाचा : Legends League Cricket: क्रिकेटच्या मैदानात मारामारी, मिचेल जॉन्सनने युसुफ पठाणला ढकलले, पंचांनी केली मध्यस्थी व्हिडिओ व्हायरल  

फलंदाजांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने मर्यादित २० षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात भारताने २३७ धावांचा डोंगर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकी संघासाठी क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन कले. डी कॉकने ४८ चेंडूत ६९ धावा केल्या, तर मिलरने ४७ चेंडूत १०६ धावांची वादळी खेळी केली. मिलरने या धावा ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केल्या. परंतु ते स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या विजयानंतर भारतीय संघाने देखील मोठा विक्रम केला आहे.

सर्वात कमी चेंडूत १००० टी२० धावा करणारे फलंदाज

सूर्यकुमार यादव – ५७३ चेंडू

ग्लेन मॅक्सवेल – ६०३ चेंडू

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या