रशियामध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धत फ्रान्सने विजेतेपदाला गवसणी घातली. या पूर्ण स्पर्धेत फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू अँटोनियो ग्रीझमन याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्याला सुरुवातीच्या टप्प्यात तितकासा प्रभाव पाडता आला. बॅड फेरीपासून त्याने आपला दर्जा दाखवत फ्रान्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा हातभार लावला. हाच ग्रीझमन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

UEFA कप स्पर्धेत फ्रान्सच्या संघाने बुधवारी गतविजेत्या जर्मनीला २-१ अशी धूळ चारली. या पराभवानंतर त्यांच्या प्रशिक्षकांवर केली जाणारी टीका चर्चेचा विषय ठरली आहे. पण त्याहीपेक्षा चर्चेचा विषय ठरला तो ग्रिझमनने डोक्याने मारलेला गोल. त्याने दुसऱ्या खेळाडूकडून पास करण्यात आलेल्या फुटबॉलवर हेडरच्या माध्यमातून गोल केला. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या या गोलला अक्षरश: डोक्यावर घेतले.

पहा Video :

दरम्यान, टोनी क्रुसने १४व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकच्या गोलने जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यांतरानंतर फ्रान्सकडून कमबॅक करण्यात आला. ग्रिझमनने ६२व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून फ्रान्सला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ग्रिझमनने हेडरद्वारे गोल करत फ्रान्सला विजय मिळवून दिला.