अनुराग ठाकूर यांनी खोटी साक्ष दिल्याचे नेमके प्रकरण काय?

सुप्रीम कोर्टाने १५ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकूर यांना फटकारले होते.

सुप्रीम कोर्टाने लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश बीसीसीआयला दिले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची सोमवारी सुप्रीम कोर्टाने पदावरून हकालपट्टी केली. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यास चालढकल केल्याप्रकरणी कोर्टाने अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई केली. याशिवाय, ठाकूर यांच्यावर सुप्रीम कोर्टात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस देखील आज कोर्टाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांनी दिली आहे.

खोटी साक्ष दिल्याचे नेमके प्रकरण काय?
अनुराग ठाकूर यांनी वारंवार कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १५ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत चांगलेच फटकारले होते.
लोढा समितीच्या शिफारशी टाळण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मदत मागितल्याचे समोर आले होते. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी हा बीसीसीआयच्या कारभारातला सरकारी हस्तक्षेप ठरतो, असे आयसीसीने बीसीसीआयला पत्राने कळवावे अशी विनंती ठाकूर यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना केली होती. अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण अशी विनंती केल्याचे नाकारले होते. मात्र, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी लोढा समितीला लिहिलेल्या पत्रामुळे ठाकूर यांनी अशी विनंती केल्याचे स्पष्ट झाले होते. शशांक मनोहर यांच्या पत्रामुळे ठाकूर यांचे सत्य पुढे आले आणि न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) यांनी सुप्रीम कोर्टाकडे ठाकूर यांच्यावर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

वाचा: सुप्रीम कोर्टाकडून अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची ‘विकेट’, पदावरून हटवले

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anurag thakur accused of lying personal perjury what is perjury

ताज्या बातम्या