एपी,ब्युनोस आयर्स : तब्बल ३६ वर्षांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर अर्जेटिनात न भूतो न भविष्यती असा जल्लोष झाला. लाखोंच्या संख्येने अर्जेटिनावासीय रस्त्यांवर उतरले होते. त्यांनी राजधानी ब्युनोस आयर्स या ऐतिहासिक अर्जेटिना स्मारकाजवळ एकत्रित जमत रात्रभर जल्लोष केला.

गतविजेत्या फ्रान्सचे आव्हान अनपेक्षित रंगलेल्या सामन्यात शूट-आऊटमध्ये ४-२ असे परतवून लावत अर्जेटिनाने १९८६ नंतर प्रथम आणि एकूण तिसरे विजेतेपद पटकावले. अर्जेटिनातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठे पडदे लावून सामन्याचे थेट प्रसारण दाखविण्यात येत होते. नियोजित वेळेत निर्विवाद वर्चस्व राखल्यापासूनच या जल्लोषाला सुरुवात झाली होती. मात्र, अचानक सामना बरोबरीत राहिल्यावर काही क्षण सर्व शांत झाले. शूट-आऊटमध्ये सामना गेल्यावर तर प्रत्येक जण श्वास रोखून तो क्षण बघत होता. मॉन्टिएलने अखेरची किक यशस्वी केल्यावर शांत झालेले चाहते बेभान होऊन नाचू लागले.

Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

ब्युनोस आयर्सच्या रस्त्यांवर जल्लोष करणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी मेसीचे नाव होते. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभे असलेले सुरक्षा कर्मचारीही नकळत जल्लोषात ओढले जात होते. हेक्टर क्विंटेरोस हा ३४ वर्षीय सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘‘आमचा देश ३६ वर्षांनी विश्वचषक जिंकला आहे. आम्हीही या जेतेपदाचा आनंद उपभोगत आहोत. जल्लोषाला गालबोट लागू नये एवढेच आम्ही पाहणार आहोत.’’

एखाद्या गोष्टीसाठी आणि तेही विश्वविजेतेपदासाठी जेव्हा झगडावे लागते, तेव्हा त्या यशाचा आनंद वेगळाच असतो. गेली काही वर्षे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अर्जेटिनाच्या नागरिकांना या विजेतेपदाने जगण्याची जणू नवी ऊर्जा दिली, असे मत फॅबियो विलानी यांनी व्यक्त केले. या जल्लोषात मॅराडोना यांचाही उल्लेख होत होता. एक १८ वर्षीय युवक झेवियर लोपेज म्हणाला, ‘‘मॅराडोना निश्चितपणे स्वर्गातून हा क्षण बघत असतील. ते नेहमीच अर्जेटिनाच्या विजयासाठी खेळले. ते असते तर हा आनंद द्विगुणित झाला असता.’’ आपले म्हणणे मांडताना लोपेजच्या डोळय़ात आनंदाश्रू होते.