आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने आपला पहिला बळी मिळवला आहे. सध्या अर्जुन तेंडूलकर भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दोन ४ दिवसीय कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झालेली होती. यानंतर आज पहिल्याच कसोटी सामन्यात अर्जुनने श्रीलंकेच्या कमील मिशहराला पायचीत केलं आहे. आपल्या संघाला पहिला बळी मिळवून देत अर्जूने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे.

अवश्य वाचा – अर्जुनच्या आंतरराष्ट्रीय संघातील निवडीबाबत सचिन म्हणतो … 

दरम्यान पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावांवर संपवला. अर्जुन तेंडूलकरव्यतिरीक्त भारताकडून हर्ष त्यागी आणि आयुष बादुनी यांनी प्रत्येकी ४-४ बळी घेतले. त्यामुळे आता भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या या आव्हानाचा पाठलाग कसा करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आशिष कपूर, ज्ञानेंद्र पांडे, राकेश पारिख यांच्या निवड समितीने अर्जुन तेंडूलकरची संघात निवड केलेली आहे. या दौऱ्यातील कसोटी संघाचं नेतृत्व दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतकडे देण्यात आलेलं आहे. दरम्यान मध्यंतरीच्या काळात अर्जुनच्या निवडीवर सोशल मीडियावर अनेक जणांनी टीका केली होती. मात्र १९ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक सनथ कुमार यांनी अर्जुनला कोणत्याही प्रकारे खास ट्रिटमेंट मिळणार नसल्याचं सांगितलं होतं.

अवश्य वाचा – अर्जुन तेंडुलकर व इतर खेळाडू मला एकसारखेच, गोलंदाजी प्रशिक्षक सनथ कुमार यांची स्पष्टोक्ती