Arjun Tendulkar Maiden 5 wicket haul Ranji Trophy: मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुनने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीत पाच विकेट्स घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या अरुणाचल प्रदेशविरुद्ध सामनयात अर्जुनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ही कमाल कामगिरी केली आहे. पोर्वोरिम येथील गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमी मैदानावर हा सामना खेळवला जात आहे.

२५ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने अरुणाचल प्रदेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने ९ षटकांत २५ धावा देत ५ विकेट घेतले. यादरम्यान अर्जुनने ३ मेडन षटकं टाकली. अर्जुनने आपल्या १७व्या प्रथम श्रेणी सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यात अरुणाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अर्जुनने अरुणाचल प्रदेशचा सलामीवीर नबाम हाचांगला क्लीन बोल्ड केले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद

अर्जुन तेंडुलकरने अरूणाचल संघाच्या ५ फलंदाजांना बाद करत संघाला जबरदस्त सुरूवात केली. पहिल्या विकेटनंतर नीलम ओबी (२२) आणि चिन्मय पाटील (३) यांनी थोडी झुंज दिली, मात्र अर्जुनने १२व्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतल्यामुळे पाहुण्या संघाची अवस्था आणखीच बिकट झाली. अर्जुनने पाच विकेट पूर्ण करेपर्यंत अरुणाचलची धावसंख्या १७.१ षटकांत ३६/५ अशी होती.

अरुणाचलचा कर्णधार नबाम अबो याने २५ चेंडूत पाच चौकारांसह नाबाद २५ धावा केल्या. परिणामी संघ ३१व्या षटकात केवळ ८४ धावांवर सर्वबाद झाला. अर्जुन व्यतिरिक्त, मोहित रेडकरने १५ धावा देत ३ विकेट्स आणि कीथ मार्क पिंटोने ३१ धावा देत २ विकेट्स घेत गोव्यासाठी चांगली गोलंदाजी केली.

हेही वाचा – Most Expensive Players in IPL: IPL इतिहासातील सर्वात १० महागडे खेळाडू आहेत तरी कोण? युवराज सिंगचा रेकॉर्ड अजूनही कायम

अर्जुनने या सामन्यापूर्वी १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतले होते, ज्यामध्ये त्याची मागील सर्वोत्तम कामगिरी ४९ धावांवर ४ विकेट होती. गोलंदाजीशिवाय अर्जुन हा खालच्या फळीतील चांगला फलंदाज आहे. त्याने २३.१३ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. ही कामगिरी अर्जुनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल.

Story img Loader