महिला हॉकी संघाची कर्णधार रितू राणी व पुरुष संघातील खेळाडू व्ही.आर. रघुनाथ यांची हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी ही माहिती दिली.
रघुनाथ व राणी यांच्याबरोबरच धरमवीरसिंग याचीही या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू व संघटक सिल्वेनुस डुंगडुंग यांची मेजर ध्यानचंद पुरस्कारासाठी, तर ज्येष्ठ प्रशिक्षक सी.आर. कुमार यांची द्रोणाचार्य या सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.
भारताने १९८० मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना डुंगडुंग यांनी स्पेनविरुद्धच्या लढतीत सुवर्णगोल करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या कनिष्ठ संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता.

Story img Loader