Olympic Gold Medalist Arshad Nadeem: अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा विक्रम रचला. अर्शद नदीम हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. अर्शदने चार दशकांनंतर पाकिस्तानला सुवर्णपदक पटकावून दिले आहे. १९८४ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने हॉकीमध्ये अखेरचे सुवर्णपदक पटकावले. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये त्याला सर्वांनीच डोक्यावर घेतलं आहे. त्याला बक्षीसाची रक्कम, सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. पण यासर्वांच्या पलीकडे त्याचे सासरे त्याला म्हैस बक्षीस म्हणून देणार आहेत. हेही वाचा - Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले? पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमच्या सासरच्यांनी त्याचे ग्रामीण भागात झालेलं संगोपन आणि परंपरा लक्षात घेऊन त्याला एक म्हैस भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद नवाज यांनी रविवारी नदीमच्या गावात स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, म्हैस भेट देणे त्यांच्या गावात 'अत्यंत मौल्यवान' आणि 'सन्माननीय' मानले जाते. नदीमने पॅरिसमधील भालाफेक स्पर्धेत ९२.९७ मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक जिंकले, भारताच्या नीरज चोप्राने दुसरे स्थान पटकावले. हेही वाचा - Vinesh Phogat: विनेशने अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढण्यामागे कोर्टात काय कारण सांगितलं? फोगटच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद नवाज म्हणाले, 'नदीमला त्याच्या परंपरेवर तो जिथून आला आहे, त्याचा खूप अभिमान आहे आणि त्याच्या यशानंतरही त्याचे घर अजूनही त्याचे गावच आहे आणि तो अजूनही त्याच्या आई-वडील आणि भावंडांसोबत राहतो. जेव्हा आम्ही आमच्या मुलीचे लग्न नदीमशी करायचे ठरवले, त्यावेळी तो छोट्यामोठ्या नोकऱ्या करत होता, पण त्याच्या खेळाप्रति असलेली त्याची तळमळ दिसत होती. घरात आणि शेतात सतत भाला फेकण्याचा सराव करत असे.' अर्शदचे सासरे पुढे म्हणाले, “जेव्हा तो आमच्या घरी येतो तेव्हा तो कशाचीही तक्रार करत नाही आणि आमच्या घरी जे काही आहे ते खातो. त्याची दोन मुले गावातील स्थानिक प्राथमिक शाळेत जाऊ लागली आहेत तर एक मुलगा अजूनही लहान आहे." हेही वाचा - Olympics : विनेश फोगटचं रौप्य पदक निश्चित? पराभवानंतरही ‘या’ खेळाडूला मिळालं पदक, क्रीडा लवादाचा निर्णय पाकिस्तानचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमचे मायदेशी परतल्यावर चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आणि आपल्या कुटुंबाला भेटताना तो भावूक झाला. नदीम मायदेशी पोहोचल्यावर 'वॉटर कॅनन सॅल्यूट'ने त्याचे स्वागत करण्यात आले. हजारो चाहते नदीमची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते आणि त्याच्या नावाचा जयघोष करत होते. नदीमने पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत ९२.९७ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. इथे पोहोचल्यावर नदीमने आई, वडील आणि मोठ्या भावाला मिठी मारली. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये भावनिक भेटीनंतर त्याच स्वागत केलं.