Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमवर ( Arshad Nadeem ) कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अर्शदच्या ( Arshad Nadeem ) सासऱ्यांनी त्याला म्हैस गिफ्ट केली. ज्यानंतर त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. आता अर्शद नदीमला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी कार गिफ्ट केली आहे. या कारचा नंबरही एकदम खास आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने ( Arshad Nadeem ) भारताच्या नीरज चोप्राला हरवलं आणि सुवर्ण पदक जिंकलं.

अर्शद नदीमला ५० हजार डॉलरचं बक्षीस

सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अर्शद नदीमला ( Arshad Nadeem ) ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळाले. तर त्याच्या सासऱ्यांनी त्याला म्हैस भेट दिली. अर्शदचे सासरे मुहम्मद नवाज यांनी अर्शदला म्हैस भेट देणार असल्याचं स्थानिक मीडियाला सांगितलं होतं. आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी अर्शदला कार भेट दिली आहे. होंडा सिविक ही कार अर्शदला भेट म्हणून मिळाली आहे. भारतात या कारची किंमत १८ ते २८ लाखांच्या घरात आहे. तर पाकिस्तानी चलनानुसार या कारची किंमत ८० लाखांच्या घरात आहे.

हे पण वाचा- Paris Olympic 2024 : भालाफेकमधील विश्वविक्रम काय आहे; Top 10 मध्ये भारताचा नीरज चोप्रा व पाकिस्तानचा अर्शद नदीम कितव्या स्थानी?

मरियम नवाज यांनी कार दिली भेट

मरियम नवाज यांनी अर्शदचं स्वागत केलं आणि त्याला कारची चावी सुपुर्द केली. या कारचा नंबरही खास आहे. अर्शदने ९२.९७ मीटर लांब भाला फेकला होता. तोच या कारचा क्रमांक आहे. PAK 9297 हा या कारचा क्रमांक आहे. अर्शदने ज्या ताकदीने भाला फेकला की त्याचं प्रचंड कौतुक झालं.

अर्शद नदीमला त्याच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी कार भेट दिली आहे. (फोटो सौजन्य-एक्स)

अर्शदवर बक्षीसांचा वर्षाव

अर्शदच्या गावात म्हैस भेट म्हणून देणे खूप मौल्यवान आणि आदरणीय मानले जाते. आता, अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत असून अर्शदने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री मरियम नवाज यांची भेट घेतली. या भेटीत मरियम नवाज यांनी अर्शदला खास गिफ्ट देऊ केली आहे. विशेष म्हणजे अर्शदला १० कोटी रुपये देण्याची घोषणाही मरयम नवाज यांनी केली होती.

तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून रातोरात स्टार बनलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल बोलायचे तर त्याचा जन्म 2 जानेवारी 1997 रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहराजवळील एका छोट्या गावात झाला. (पीटीआय फोटो)

अरशद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड अन् सुवर्णपदक

अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. अरशद नदीमने ९२.९७ मीटर फेक केली होती. त्याच्या या थ्रोची ऑलिम्पिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नीरज चोप्राने ८९.४५ मीटर फेक करून रौप्य पदक पटकावलं.