Arshdeep Singh Celebration: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्य सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. या डावात अर्शदीप सिंगने दमदार गोलंदाजी केली. १० षटकात ७ च्या इकॉनॉमीने ७० धावा खर्च करून त्याने सर्वाधिक ४ गडी बाद केले. यादरम्यान विकेट घेतल्यानंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं होतं. सामना झाल्यानंतर त्याने हे सेलिब्रेशन का केलं, यामागचं कारण सांगितलं.

सामना झाल्यानंतर ब्रॉडकास्टर्सकडून अर्शदीप सिंगला ते सेलिब्रेशन नेमकं कोणासाठी होतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अर्शदीप सिंग म्हणाला, “ते सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं. आम्ही जेव्हाही फिरायला जातो, ज्यावेळी असे डान्स स्टेप्स करतो. ज्यावेळी आमचा मूड खराब असतो, त्यावेळी आम्ही उत्साह वाढवण्यासाठी असं करतो. त्यामुळेच हे सेलिब्रेशन केलं.”

या सामन्यात गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग सुरूवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर भारी पडला. या डावात गोलंदाजी करताना त्याने विल यंगला ९, हेन्री निकोल्सने ९, ग्लेन फिलिप्सला ३० आणि काइल जेमिसनला एका धावेवर बाद करत माघारी धाडलं.सामना झाल्यानंतर त्याला आवडता विकेट कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना अर्शदीप सिंग म्हणाला, “पाचवा विकेट माझा आवडता विकेट असू शकला असता. पण मला पाचवा विकेट मिळू शकला नाही. त्यामुळे मी अजूनही पाचव्या विकेटच्या शोधात आहे.”

न्यूझीलंडचा पहिला डाव १८५ धावांवर आटोपला

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीला आलेला टीम सेफर्ट ३८ धावांवर माघारी परतला. तर विल यंग अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिचेलने २८ आणि शेवटी ग्लेन फिलिप्सने ३० तर टिकनरने ३४ धावांचे योगदान दिले. पण न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर आटोपला.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर गुरनूर ब्रारने ४४ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तर अंशूल कंबोजने अवघ्या २२ धावा खर्च करून २ गडी बाद केले.