मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जामीन मिळाल्यानंतर आर्यन पहिल्यांदाच आपली बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहाना खान सोबत दिसला आहे. निमित्त ठरलं आयपीएलच्या लिलावाचं.

शाहरुख खानची मुलं आर्यन खान आणि सुहाना खान यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या टेबलवर इंडियन प्रीमियर लीग लिलावादरम्यान त्याच्यासाठी अर्ज भरला. कोलकाता नाईट रायडर्स ही टीम शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या संयुक्त मालकीची आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं आहे.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

IPL लिलावाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका कथित अंमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केली होती, त्यामुळे तो चर्चेत आला होता. NCB ने क्रूझ शिप पार्टीवर ड्रग्जच्या छाप्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेतले होते. आर्यन तीन आठवडे मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होता.

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर सुहाना आणि आर्यन पहिल्यांदाच एकत्र सार्वजनिकरित्या दिसले. शाहरुख अलीकडेच प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या मुंबईतील अंत्यविधीदरम्यान दिसला होता. शनिवारच्या मुख्य कार्यक्रमाच्या एक दिवस आधी, आर्यन खान आणि सुहाना खान देखील आयपीएल-पूर्व लिलावाच्या ब्रीफिंग दरम्यान केकेआरच्या टेबलवर दिसले होते. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सुहाना खानने आयपीएल लिलावात प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे, आर्यन गेल्या वर्षीही केकेआरच्या टेबलवर उपस्थित होता. गेल्या वर्षीच्या लिलावात, जुही चावलाची १९ वर्षीय मुलगी जान्हवी मेहता ही या ठिकाणी बोली लावणारी सर्वात लहान व्यक्ती होती.