scorecardresearch

IPL : आर्यन खाननं ‘या’ खेळाडूला घेतलं होतं KKR संघात, आज तोच गाजवतोय यूएईचं मैदान!

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात आर्यन उपस्थित होता, त्यानं ‘या’ खेळाडूवर बोली लावली.

Aryan khan buy venkatesh iyer in kolkata knight riders squad
केकेआर संघ आणि आर्यन खान

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आयपीएल २०२१ मध्ये दमदार पुनरागमन केले आहे आणि प्लेऑफसाठी आपला मजबूत दावा सादर केला आहे. शाहरुख खानच्या मालकीचा केकेआर संघ सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंतच्या प्रवासात केकेआरचा स्टार म्हणून उदयास आलेला खेळाडू म्हणजे व्यंकटेश अय्यर. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने लिलावादरम्यान या खेळाडूवर बोली लावली होती. व्यंकटेश आज आयपीएलमधील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात शाहरुख आणि जुही चावलाऐवजी त्यांची मुले लिलावात दिसत होती. जुही चावलाची मुलगी जान्हवीही आर्यनसोबत लिलावाच्या टेबलवर दिसली. आर्यन खेळाडूंबद्दल चर्चा करताना दिसला. त्याने अनेक युवा खेळाडूंना केकेआरशी जोडले, जे आता लीगमध्ये दमादार कामगिरी करत आहेत.

हेही वाचा – IPL 2021 : अरेरे..! नितीश राणाच्या ‘त्या’ चौकारामुळं झालं मोठं नुकसान; पाहा VIDEO

असे असले, तरी संपूर्ण व्यवस्थापन कोणत्याही खेळाडूला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेते. आर्यन व्यतिरिक्त, फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर, जय मेहता आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर देखील लिलावाच्या टेबलवर उपस्थित होते. आर्यन आणि जान्हवी दोघेही या दरम्यान अनुभवी व्यक्तीप्रमाणे बोली लावताना दिसले. आर्यनने व्यंकटेश अय्यरला केकेआरमध्ये फक्त २० लाख रुपयांमध्ये समाविष्ट केले होते आणि आज हा खेळाडू कोट्यवधी रुपयांच्या खेळाडूंपेक्षाही जबरदस्त कामगिरी करत आहे. केकेआरने लिलावात एकूण ७.५५ कोटी रुपये खर्च केले.

आयपीएल २०२१च्या यूएई टप्प्यात व्यंकटेशला पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही स्तरावर चांगली कामगिरी करत आहे. त्याने आरसीबीविरुद्ध ४१, मुंबई इंडियन्स विरुद्ध ५३ आणि पंजाब किंग्जविरुद्ध ६७ धावा केल्या. शिवाय गोलंदाजीत त्याने त्याने दिल्लीविरुद्ध दोन आणि पंजाबविरुद्ध एक विकेट घेतली. आता प्रत्येक फ्रेंचायझीची नजर अय्यरवर आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तर अगदी पुढच्या हंगामाच्या मेगा लिलावामध्ये या खेळाडूला सुमारे १४ कोटी रुपयांची बोली लावता येईल, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2021 at 15:53 IST

संबंधित बातम्या