MCC on Usman Khawaja: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी कर्णधार बेन स्टोक्सच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही यजमानांना ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर गारद झाला. कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची शानदार खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले पण तो पार करण्यात अपयशी ठरला.

या सामन्यातील विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमच्या लॉंग रुममध्ये एक अशोभनीय घटना पाहायला मिळाली. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर दोन्ही संघांमधील चुरशीच्या लढतीत दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर चाहत्यांशी भिडले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून या गैरवर्तनासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला जबाबदार धरले आहे. काहींनी खेळाडूंना हातही लावला. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते ऑस्ट्रेलियन खेळाडू त्या परिसरातून जात होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

novak djokovic into wimbledon semifinals without playing qf
नोव्हाक जोकोविच न खेळताच उपांत्य फेरीत
euro 24 england vs netherlands match prediction
इंग्लंडला कामगिरीत सुधारणेची आस; आज नेदरलँड्सविरुद्ध उपांत्य लढत; प्रमुख खेळाडू चमकण्याची गरज
Rohit Sharma takes a bite of Barbados pitch after T20 World Cup win
IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?
IND vs SA Final Highlights T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final Highlights : सूर्यकुमार यादवचा झेल ठरला निर्णायक! टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
t20 cricket world cup final India vs south africa match preview
तुल्यबळांमध्ये वर्चस्वाची लढाई! ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम लढतीत आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
Rishabh Pant 'Casually' Does A Dhoni; Stumps Moeen Ali Nonchalantly Off Axar
IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल
Argentina beat Canada by 20 points in the first match
अर्जेंटिना संघाची दमदार सुरुवात; पहिल्याच सामन्यात कॅनडावर २० अशी सरशी; मेसीची चमक
Babar Azam Accused for Fixing in PAK vs USA Match Watch Video
T20 WC 2024: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने केलं फिक्सिंग? पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचा आरोप; VIDEO व्हायरल

अंपायर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला

सुरुवातीला उस्मान ख्वाजा प्रेक्षकांशी बोलताना दिसला. त्यावेळी चाहत्यांनी संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. रांगेत मागच्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरने प्रेक्षक आणि ख्वाजा यांच्यातील जोरदार वादावादीचे संपूर्ण वर्णन केले. अशा स्थितीत वॉर्नर देखील तेथील प्रेक्षकांशी वाद घालताना दिसला. यावेळी अंपायर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण कुठेतरी संपले आहे.

एमसीसी सदस्य ऑस्ट्रेलियन संघाला शिवीगाळ करत होते

या वादाचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये अधिक लोक ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंना शिवीगाळ करत त्यांना चीटर-चीटर म्हणत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जागतिक क्रिकेटमध्ये लाँग रूमचे विशेष स्थान आहे. पॅव्हेलियनमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडूंनी येथून जाणे ही सन्मानाची बाब आहे. मात्र, घडलेली घटना ही निंदनीय स्वरुपाची असून आम्ही याचा तीव्र स्वरुपात निषेध करतो.”

हेही वाचा: ENG vs AUS: लॉर्ड्सच्या लाँग रूममध्ये ख्वाजा-वॉर्नरची प्रेक्षकांशी बाचाबाची! सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केली मध्यस्थी, पाहा Video

एमसीसीने माफी मागितली

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एमसीसीने अधिकृत निवेदन जारी करून या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागितली. यासंदर्भात एमसीसीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “रविवारी सकाळच्या सत्रानंतर घडलेल्या प्रकार हा दुर्दैवी होता. त्यावेळी सर्व इंग्लंडच्या चाहत्यांच्या भावना उफाळून आल्या होत्या. दुर्दैवाने काही सदस्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अपशब्द वापरले. याबद्दल आम्ही ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागतो. त्याचबरोबर जे सदस्य सन्मानाची काळजी घेणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करून शिस्तभंगाची नोटीस दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला विनाकारण मैदानाबाहेर करण्याची गरज नव्हती. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा असे घडले नाही, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही.” लॉर्ड्स कसोटी ४३ धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाने २०२३ अ‍ॅशेसमध्ये २-० अशी आघाडी घेतली. हेडिंग्ले येथे ६ जुलैपासून मालिकेतील तिसर्‍या कसोटीत दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.