नूतन कर्णधार पॅट कमिन्ससह (५/३८) अन्य वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची भंबेरी उडाली. त्यामुळे अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या १४७ धावांवर आटोपला.

ब्रिस्बेन येथे बुधवारपासून सुरू झालेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे अवघ्या ५०.१ षटकांचाच खेळ होऊ शकला. इंग्लंडचा संघ गारद झाल्यावर पावसाचे आगमन झाल्याने अखेरचे संपूर्ण सत्र वाया गेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT: फ्लाईंग माही… गुजरातविरूद्ध सामन्यात टिपला आश्चर्यचकित करणारा झेल, ४२ वर्षीय धोनीच्या कॅचच्या VIDEO पाहाच

मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रोरी बन्र्सचा शून्यावर त्रिफळा उडवून धडाक्यात प्रारंभ केला. यानंतर जोश हेझलवूड आणि कर्णधार म्हणून कारकीर्दीतील पहिलीच कसोटी खेळणाऱ्या कमिन्सने इंग्लंडच्या फलंदाजांना हैराण केले. हेझलवूडने कर्णधार जो रूट (०) आणि डेव्हिड मलान (६) यांना बाद केले. तर कमिन्सने बेन स्टोक्सचा (५) अडथळा दूर केला. ५ बाद ६० धावांवरून ओली पोप (३५) आणि जोस बटलर (३९) यांनी सहाव्या गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी रचून इंग्लंडला किमान तीन आकडी धावसंख्या गाठून दिली. स्टार्कने बटलरला माघारी पाठवून ही जोडी फोडल्यावर कमिन्सने शेपटाला गुंडाळत अ‍ॅशेस मालिकेत प्रथमच पाच बळी मिळवण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ५०.१ षटकांत सर्व बाद १४७ (जोस बटलर ३९, ओली पोप ३५; पॅट कमिन्स ५/३८, मिचेल स्टार्क २/३५)