ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील चौथ्या अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस पावसाने गाजवला. पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध सुरुवात करताना ३ बाद १२६  धावांपर्यंत मजल मारली. 

सिडनी येथे खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत पहिल्या दिवशी ४६.५ षटकांचाच खेळ शक्य झाला. उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ ६, तर उस्मान ख्वाजा ४ धावांवर खेळत आहे. पावसामुळे दिवसातील एकूण तीन तासांचा खेळ वाया गेला.

IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO
IPL 2024 CSK vs RCB Match Updates in Marathi
CSK vs RCB : विराट कोहली चेन्नईविरुद्ध रचणार इतिहास, पहिली धाव घेताच करणार खास विक्रमाची नोंद

नाणेफेके जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर (३०) आणि मार्कस हॅरिस (३८) यांनी ५१ धावांची सलामी दिली. स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावरील मार्नस लबूशेन (२८) आणि हॅरिस यांनी

दुुसऱ्या गड्यासाठी ६० धावांची भर घातली. परंतु दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची १ बाद १११ धावांवरून ३ बाद ११७ अशी अवस्था झाली.

अखेर ४७वे षटक सुरू असताना पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने पंचांनी निर्धारित वेळेच्या ३७ मिनिटांपूर्वीच खेळ संपल्याचे जाहीर केले.