इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ क्रिकेट जगतातील सर्वात पहिले कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. या दोन्ही संघांमध्ये खेळवली जाणारी चुरशीची कसोटी मालिका म्हणजेच प्रसिद्ध अॅशेस मालिका खेळवली जाते. ही मालिका यंदा २१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. पण या स्पर्धेच्या अॅशेस ट्रॉफीमध्ये खरंच राख असते का; जाणून घेऊया.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २१ नोव्हेंबरपासून ७७वी अॅशेस मालिका खेळवली जाणार आहे. टी-२० क्रिकेट, द हंड्रेड सारख्या छोट्या फॉरमॅटमधील स्पर्धा अस्तित्त्वात आल्यानंतरही या कसोटी मालिकेने आपला दबदबा कायम राखला आहे. जगभरातील सर्वांच्या चाहत्यांच्या नजरा या मालिकेवर असणार आहेत.
१८८२ साली ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच पराभव केला होता. क्रिकेटचा उगम ज्या इंग्लंडमध्ये झाला, त्याच संघाचा पराभव झाल्यामुळे चाहते फार दुखावले होते. यानंतर द स्पोर्टिग टाईम्स वृत्तापत्राने उपाहासात्मक लेख लिहित टीका केली होती. ज्यामध्ये इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाल्याने त्याची राख ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवी. यानंतर या स्पर्धेला अॅशेस असं नाव पडलं.
वृत्तपत्रातील लेखाच्या या एका ओळीवरून या स्पर्धेला कोणत्याही माजी खेळाडूचं नाव न मिळता अॅशेस हे नाव पडलं. या १८८२ च्या मालिकेनंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. त्यावेळेस खरंच राख तयार केली गेली. स्टंपवरील दोन बेल्स जाळण्यात आल्या आणि त्याची राख एका कलशात ठेवण्यात आली. आता जो संघ अॅशेस कसोटी मालिकेत विजय मिळवतो, त्या संघाला या कलशाची प्रतिकृती दिली जाते. कारण कलश म्हणजेच ही खरी ट्रॉफी खूप जीर्ण झाली आहे.
स्पर्धेचा हा मूळ कलश लॉर्ड्सवरील मेरिलोबोन क्रिकेट क्लबच्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. सध्या अॅशेस मालिकेची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. २०१९ मधील अॅशेस मालिका ड्रॉ झाली होती. त्यामुळे २०१७ ची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने ट्रॉफी कांगारू संघाकडे आहे. १९७२ नंतर ऑस्ट्रेलिया- इंग्लंडमधील कसोटी मालिका ड्रॉ झाली होती.
