जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी (Ashleigh Barty) हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. या बातमीमुळे क्रीडा जगतातसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि जड अंतःकरणाने टेनिसला अलविदा करत असल्याचं म्हटलंय.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना अ‍ॅश्ले बार्टीने निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता. गेल्या तीन वर्षांत तिने आपल्या कारकिर्दीतील तीन ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सर्वप्रथम तिने २०१९ मध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर २०२१ मध्ये विम्बल्डन आणि त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते.

educational opportunities in banking technology
शिक्षणाची संधी : बँकिंग टेक्नॉलॉजीमधील संधी
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

बार्टीने २३ मार्च रोजी सकाळी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून निवृत्तीची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये ती तिचा मित्र केसीसोबत संवाद साधताना दिसत आहे. यावेळी निवृत्तीची घोषणा करतना तिला अश्रू अनावर झाले.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अॅश्ले बार्टीने लिहिले की, “आजचा दिवस माझ्यासाठी कठीण आणि भावनिक दिवस आहे. कारण मी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. ही बातमी तुमच्यासोबत कशी शेअर करावी हे मला कळत नव्हते म्हणून मी माझ्या मित्राला Casey DeLuca मदत करण्यास सांगितले. या खेळाने मला जे काही दिले त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आणि अभिमानी आहे. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे आभार.”

दरम्यान, भारतीय स्टार सानिया मिर्झाने देखील अॅश्लेच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘अभिनंदन… तू इतरांसाठी प्रेरणा आहेस, गुडलक मेट!’, असं तिने म्हटलंय.

अश्लेची खेळातील कारकिर्द –

अॅश्ले बार्टीने २०१४ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सिनियर टेनिस खेळायला सुरुवात केली होती. २०१४ च्या यूएस ओपनमध्ये ती हरली होती. त्यानंतर ती क्रिकेटकडे वळली. मात्र, २०१६ मध्ये ती पुन्हा टेनिसमध्ये परतली आणि २०१७ मध्ये तिने मलेशियन ओपनच्या रूपाने पहिले WTA विजेतेपद जिंकले. आता तिच्या नावावर तीन ग्रँडस्लॅम व्यतिरिक्त, WTA मध्ये १५ सिंगल्स आणि १२ डबल्स टायटल आहे. ती सध्या जगातील नंबर १ टेनिसपटू आहे. अशात तिचा टेनिस सोडण्याचा निर्णय धक्का देणारा आहे. ती सलग ११४ आठवडे जगातील अव्वल टेनिसपडू राहिली असून सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे.