पीटीआय, नवी दिल्ली
युवा बॅडिमटनटू अश्मिता छलिहाने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत मंगळवारी पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद करताना पाचव्या मानांकित एव्हगेनिया कोसेत्सकायाला पराभूत केले. अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत विश्वविजेत्या लो कीन येवला पहिल्या विजयासाठी तीन गेमपर्यंत झगडावे लागले, तर किदम्बी श्रीकांतने दिमाखदार विजय नोंदवला.

लो याने कॅनडाच्या शिओडाँग शेंगला १६-२१, २१-४, २१-१३ असे नमवले. श्रीकांतने सिरी वर्मावर २१-१७, २१-१० असा विजय मिळवला. चिराग सेनचे आव्हान मात्र सलामीलाच संपुष्टात आले. त्याने ८-२१, ७-२१ असा मलेशियाच्या सूंग जू व्हेनकडून पराभव पत्करला. बिगरमानांकित छलिहाने फक्त ३१ मिनिटांत जागतिक क्रमवारीत २८व्या क्रमांकावरील रशियाच्या कोसेत्सकायाला २४-२२, २१-१६ असे नामोहरम केले. याचप्रमाणे दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने श्रीकृष्णा प्रिया कुदारावल्लीवर २१-५, २१-१६ असा विजय मिळवला.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
chess candidates 2024 nepomniachtchi beats vidit gujrathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

मिश्र दुहेरीत के. साईप्रतीक आणि गायत्री गोपीचंद जोडीने इशान भटनागर आणि तनिशा कॅस्ट्रो जोडीचा २१-१६, १६-२१, २१-१७ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत अग्रमानांकित मोहम्मद एहसान आणि हेंड्रा सेटियावान या इंडोनेशियाच्या जोडीने भारताच्या प्रेम सिंह चौहान आणि राजेश वर्मा जोडीला २१-१८, २१-१० असे हरवले.