India A Updated Squad: भारत अ संघ सध्या श्रीलंकेत सुरू असलेली तिरंगी मालिका खेळत आहे. श्रीलंका अ, अफगाणिस्तान अ आणि भारत अ हे देश या तिरंगी मालिकेत खेळत आहेत. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर संघाला पुढील दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. श्रीलंका अ विरूद्ध दुसऱ्या सामन्यात तर तिलक वर्मा व खेळाडूंचा पंचांशी तर वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद झाला होता. या सलग दोन पराभवांनंतर आणि वादानंतर बीसीसीआयने संघात मोठा बदल केला आहे.

तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंका अ संघाचा पराभव केला असला, तरी दुसऱ्या सामन्यात डीएलएस पद्धतीनुसार त्यांना अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. तिसरा सामना बरोबरीत सुटला, परंतु त्यानंतर झालेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. दरम्यान, संघात एक बदल करण्यात आला आहे; अशोक शर्माचा संघात समावेश करण्यात आला असून, युद्धवीर सिंगला वगळण्यात आलं आहे.

बीसीसीआयने तिरंगी मालिकेदरम्यान भारत ‘अ’ संघात बदल केला आहे. या बदलाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितलं की, निवड समितीने ‘युधवीर सिंग’च्या जागी ‘अशोक शर्मा’चा ‘भारत अ’ संघात समावेश केला आहे; हा संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी गोलंदाजी करताना युधवीरला उजव्या खांद्यामध्ये वेदना जाणवल्या; याआधी ११ जून रोजी क्षेत्ररक्षणाच्या सराव सत्रादरम्यानही त्याला अशाच पद्धतीने त्रास होत होता.

बीसीसीआयन पुढे म्हटलं की, सल्लामसलत केल्यानंतर, वैद्यकीय पथकाने युधवीरला उजव्या रोटेटर कफच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या देखरेखीखाली टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला आहे.

अशोक शर्माने या आयपीएलमध्ये सहा सामन्यांत सहा बळी घेतले. विकेट्सची संख्या कमी असली तरी त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. या तिरंगी मालिकेतील भारताचा पुढील सामना १७ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अशोकला खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, संघ अंतिम फेरीत पोहोचेल की नाही, याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

तिरंगी मालिकेसाठी सुधारित भारत अ संघ

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बदोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विप्रज निगम, यश ठाकूर, अंशुल कंबोज, अरशद खान, अनुकूल रॉय, अशोक शर्मा