Ashton Agar was ruled out of World Cup 2023 Squad due to injury: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. आता ते सुरू व्हायला फारसा वेळ राहिलेला नाही. याआधी ऑस्ट्रेलियन संघाला फिरकी अष्टपैलू ॲश्टन अगरच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला २८ सप्टेंबरपर्यंतच विश्वचषकासाठी संघात बदल करण्याची संधी आहे.
द डेली टेलिग्राफच्या बातमीनुसार, ॲश्टन आगर त्याला झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही. याच कारणामुळे तो नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर पडला होता. या महिन्याच्या सुरुवातीला अॅश्टन आगरची ऑस्ट्रेलियाच्या तात्पुरत्या विश्वचषक संघात निवड झाली होती, परंतु पहिल्या मुलाच्या जन्मामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर मायदेशी परतला होता. नंतर तो भारताविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात समावेश होण्याची अपेक्षा नाही.
लाबुशेनला विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता –
तन्वीर संघा, मार्नस लॅबुशेन आणि मॅथ्यू शॉर्ट यांची नावे ॲश्टन अगरच्या जागी येत आहेत, परंतु लाबुशेनला संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात मार्नस लॅबुशेनने आपला गमावलेला फॉर्म परत मिळवला होता. लाबुशेनने ३ सामन्यांच्या मालिकेत ४६ च्या सरासरीने १३८ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. मार्नस लाबुशेनची यापूर्वी विश्वचषक संघात निवड झाली नव्हती, परंतु आता या मेगा स्पर्धेसाठी त्याला ऑस्ट्रेलिया संघात वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते.
हेही वाचा – Asian Games स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ चीनमध्ये पोहोचला, नीरज चोप्रासोबत दिसली टीम इंडिया
ट्रॅव्हिस हेड संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरेल –
वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघावर नजर टाकली, तर ट्रॅव्हिस हेड या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरेल. हेडच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते, त्यामुळे तो भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. मात्र आता त्याला या संघात कायम ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन संघ ८ ऑक्टोबरला भारताविरुद्धच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे.