भारताचा फिरकीपटू आर. अश्विनसह १५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला आहे. आर. अश्विनसह तिरंदाजीपटू अखिलेश वर्मा, महिला धावपटू टिंटू लुका, बॅडमिंटनपटू व्ही. दिजू, बास्केटबॉलपटू गीतू अ‍ॅन जोस, बॉक्सिंगपटू जय भगवान, महिला नेमबाजपटू हीना सिद्धू, कबड्डीपटू ममता पुजारी, गोल्फपटू अनिरबन लाहिरी, स्क्वॉशपटू अनाका आलांकामोनी, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ, वेटलिफ्टर रेणूबाला चानू, कुस्तीपटू सुनील राणा आणि पॅरालिम्पकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एच. एन. गिरीशा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Story img Loader