इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या हंगामात खांद्याची दुखापत आणि लय न गवसल्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान फारसा चमक दाखवू शकला नाही. परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनचा सल्ला विश्वचषकात खेळताना उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘‘माझ्यासाठी यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम समाधानकारक नसला तरी अश्विनबरोबर घालवलेल्या काळात मला खूप काही शिकायला मिळाले. त्याने मला खेळातील बारकाव्यांबाबत खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. ‘आयपीएल’दरम्यान माझा खांदा दुखावला गेला होता. मात्र, विश्वचषकापूर्वी मी आता पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतणार आहे,’’ असे मुजीबने सांगितले.