आशिया कपमधील ‘सुपर ४’ मध्ये पाकिस्तानविरोधात पराभव झाल्यानंतर भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगवर खापर फोडलं जात आहे. पाकिस्तानने पाच गडी राखत विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला लक्ष्य करण्यात येत असून, ट्रोल केलं जात आहे. अर्शदीपने सोडलेला झेल आणि अखेरच्या षटकात केलेली गोलंदाजी यासाठी कारणीभूत ठरत आहे. अर्शदीपने मात्र आपल्या आई-वडिलांशी बोलताना, आपण सर्व ट्वीट पाहून हसत असल्याचं म्हटलं आहे. आपण यामधून फक्त सकारात्मक गोष्टीच घेणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

अर्शदीपचे वडील दर्शन यांनी इंडियन एक्स्प्रेशी बोलताना सांगितलं की “अर्शदीनपे सर्व टीका सकारात्मकपणे घेतली आहे. त्याच्यातील उत्साह कायम दिसत होता. आपण सर्व मेसेज आणि ट्वीटवर हसत आहोत, मी यातून फक्त सकारात्मक गोष्टी घेणार आहे. या घटनेने माझा आत्मविश्वास अजून वाढवला आहे असे त्याचे नेमके शब्द होते”. संपूर्ण भारतीय संघ आपल्या पाठीशी असल्याचं त्याने सांगितलं असल्याची माहिती त्याची आई बलजीत यांनी दिली आहे.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

“हा तर खलिस्तानी, संघातून बाहेर काढा,” भारत-पाक सामन्यात झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंगवर केली जातेय टीका

पाकिस्ताविरोधातील सामन्यात १८ व्या ओव्हरला अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर शेवटच्या षटकात पाकिस्तानला जिंकण्यासाठी सात धावांची गरज असताना अर्शदीप सिंगकडे गोलंदाजीची जबाबदारी होती. पण पाकिस्तानने पाच गडी आणि एक चेंडू राखत सामना जिंकला.

धोनीबद्दलचं विराट कोहलीचं ‘ते’ विधान सुनील गावसकरांना जिव्हारी लागलं, म्हणाले, “नेमका कोणता…”

“एक पालक म्हणून खूप वाईट वाटतं. तो फक्त २३ वर्षांचा आहे. मला ट्रोलिंगबद्दल फार काही बोलायचं नाही. तुम्ही प्रत्येकाचं तोंड बंद करु शकत नाही. चाहत्यांविना खेळ नाही. काहीजण कोणत्याही स्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि काहींना एक पराभवही पचत नाही. पण शेवटी एकच संघ सामना जिंकू शकतो,” अशा भावना दर्शन सिंग यांनी व्यक्त केल्या आहेत.

विराट कोहलीने केली अर्शदीपची पाठराखण

“कोणाकडूनही चुका होऊ शकतात. भारत-पाकिस्तान सामन्यात खूप दबाव होता. मात्र या चुकांमधून शिकणं गरजेचं आहे. तसंच या चुकांमधून धडा घेऊन पुढे वाटचाल करायची असते. सध्या भारतीय संघामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. जेव्हा काही चुका घडतात तेव्हा वरिष्ठ खेळाडू मार्गदर्शन करतात. खेळाडू चुकीतूनच शिकत असतात. चुकांमधून धडा घेऊन पुन्हा एकदा तशा परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले पाहिजे,” असे विराट कोहली म्हणाला.

“मला अजूनही आठवतं, मी पहिला चॅम्पिअन्स ट्रॉफी सामना खेळत होतो आणि तोदेखील पाकिस्तानविरोधात होता. शाहिद आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मी फार वाईट शॉट खेळलो होतो. मी पहाटे ५ वाजेपर्यंत छतावरील पंख्याकडे पाहत होतो. मला झोपच येत नव्हती. आपलं करिअर संपलं असं वाटत होतं,” अशी आठवणही कोहलीने सांगितली.