Asia Cup 2018 : दुखापतग्रस्त हार्दिकसाठी टीम इंडियाचा बॅकअप प्लान, दीपक चहरला दुबईत पाचारण

पांड्याच्या पाठीला दुखापत

दिपक चहर (संग्रहीत छायाचित्र)

आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली होती. सुदैवाने पाकिस्तानी संघाला १६२ धावांत गुंडाळण्यामध्ये भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले, यानंतर पाकचं आव्हान भारतीय फलंदाजांनी लिलया पार केल्यामुळे हार्दिक पांड्याची उणीव संघाला जाणवली नाही. मात्र हार्दिकच्या पाठीला झालेली दुखापत पाहता बीसीसीआयने संघासाठी आपला बॅकअप प्लान तयार ठेवला आहे. दिपक चहरला हार्दिकच्या जागेवर पर्याय म्हणून दुबईत पाचारण करण्यात आलेलं आहे.

सध्या भारतीय संघाचे फिजीओथेरपिस्ट आणि डॉक्टरांची टीम हार्दिक पांड्यावर उपचार करते आहे. हार्दिक पांड्याला उभं राहता येतंय की नाही याची तपासणी केली जात आहे. मात्र हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर असल्यास आगामी सामन्यांमध्ये भारताला याचा चांगलाच फटका बसलण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीमधून सावरतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : हार्दिक पांड्या जायबंदी, भारताच्या चिंतेत वाढ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asia cup 2018 deepak chahar called up as a back up for hardik pandya