scorecardresearch

Asia Cup 2022: अफगाणिस्तानच्या ‘त्या’ सुंदरीला पाहून नेटकरी म्हणतात मॅच बघायला येऊ नको नाहीतर आम्ही..पाहा Photos

IND Vs AFG: टीम इंडियाच्या चाहत्यांनी थेट एका अफगाणिस्तानच्या सुंदरीला थेट मॅच बघायला येऊ नकोस असं सांगितलंय.

Wazhma Ayubi
Wazhma Ayubi (फोटो:इंस्टाग्राम)

Asia Cup 2022 IND vs AFG: भारत- पाकिस्तान सामन्यानंतर आशिया चषकाचा उत्साह आणखीनच वाढत चालला आहे. मैदानावर लढणाऱ्या संघांपेक्षा त्यांच्या चाहत्यांमधील चुरसच अधिक रंजक ठरत आहे. महिला, पुरुष, लहान मुलं एकूण एक क्रिकेटप्रेमी आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी विरुद्ध संघाशी ऑनलाईन पंगा घेत आहेत. ट्विटरवर आपणही अशा अनेक मीम्सची उदाहरणं बघितलीच असतील. यावेळी तर टीम इंडियाच्या चाहत्यांनी थेट एका अफगाणिस्तानच्या सुंदरीला थेट मॅच बघायला येऊ नकोस असं सांगितलंय.

वझमा अयुबी (Wajma Ayubi) असे या तरुणीचे नाव असून बांग्लादेश विरुद्ध सामन्यात ती अफगाणिस्तानच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात आली होती. हातात झेंडा घेऊन अफगाणिस्तानच्या संघाला प्रोत्साहन देणाऱ्या वझमा यांचा उत्साह कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यांना टीव्हीवर पाहताच अनेकजण त्यांचे फॅन झाले. ट्विटरवर सुद्धा वझमा यांची झलक असणारी काही सेकंदाची क्लिप जोरदार व्हायरल होत आहे. काही भारतीय क्रिकेटप्रेमींनी तर तिला तू भारताविरुद्ध अफगाणिस्तान सामना पाहायला येऊ नकोस नाहीतर आम्ही भारत सोडून अफगाणिस्तानच्या संघासाठीच टाळ्या वाजवत बसू असा मजेशीर सल्ला सुद्धा दिला आहे.

(Asia Cup 2022 : अफगाणिस्तान सुपर ४ मध्ये जाणारा पहिला संघ; तर गुणतालिकेत भारत…)

वझमा या एक व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना क्रिकेटमध्ये रस असल्याने त्या बांगलादेश विरुद्ध सामन्यात दिसून आल्या होत्या. आता भारत विरुद्ध सामन्याच्या वेळी वझमा मैदानात दिसणार का आणि दिसल्या तर भारतीय चाहते खरंच अफगाणिस्तानच्या बाजूने होणार का हेच बघायला हवं.

दरम्यान, आशिया चषक २०२२ मधील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगला होता. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ब गटातील या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आणि सुपर ४ मध्ये दमदार प्रवेश केला. अफगाणिस्तानने यापूर्वी पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-08-2022 at 18:37 IST

संबंधित बातम्या