आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत आज अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दुबईतील शारजाह क्रिकेट स्टेडिअमवरती हा सामना पार पडणार आहे. हा सामना अफगाणिस्तानसह भारतासाठी खूप महत्वाचा आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केल्यास भारतीय संघ अंतिम सामन्यामध्ये झेप घेऊ शकतो. पण, पाकिस्तान संघ जिंकल्यास भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिय चषक स्पर्धेतून बाहेर पडतील.

मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाला पाकिस्तानचे आव्हान पेलणे सोपं असणार नाही आहे. कारण, अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत दोन टी-२० तर चार एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला तर इतिहास घडणार आहे. तसेच, भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याचा आशाही अबाधित राहणार आहेत.

आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानने दमदार सुरूवात केली होती. गट सामन्यांमध्ये अफगाणिस्तानने श्रीलंकेला आणि बांग्लादेशला पराभूत करत चौथ्या फेरीत स्थान मिळवलं होते. पण, चौथ्या फेरीच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आज अफगाणिस्तानसाठी करो या मरोची लढाई असणार आहे.


दुसरीकडे, भारतीय संघाचं आशिया चषक स्पर्धेतील अस्तित्व पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मात केल्यास भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडेल.

असा असेल अफगाणिस्तान संघ – हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी(कर्णधार), करीम जनात, रशीद खान, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी


असा असेल पाकिस्तान संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज