आशिया चषक स्पर्धेत अटीतटीच्या लढती होत आहेत. अव्वल चार संघांत प्रवेश करण्यासाठी सर्वच संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान पाकिस्तानविरोधातील विजयानंतर आज भारताची हाँगकाँगविरोधात लढत होणार आहे. भारत संघ हाँगकाँग संघाच्या तुलनेत सरस असून आजच्या सामन्यात भारताचा विजय निश्चित आहे, असे म्हटले जात आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. याच कारणामुळे भारत आपली विजयी वाटचाल कायम राखणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संघात बदल होणार का?

आजचा सामना हाँगकाँग या देशाविरोधात असल्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हन निवडताना प्रयोग करू शकतो. पाकिस्तानविरोधातील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या केएल राहुलला वगळून ऋषभ पंतला संधी दिली जाते का हे पाहावे लागेल. तसेच भारताकडे दीपक हुडा हादेखील धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यालादेखील संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. मागील सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहल खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर आर. आश्विन या अष्टपैलुला रोहित संधी देऊ शकतो.

भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

हाँगकाँग संघाचे संभाव्य प्लेइंग ११

निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मिन मोर्तझा, किनचित शाह, स्कॉट मॅकेनी (यष्टीरक्षक), हारून अर्शद, एजाज खान, झिशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार

सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

सामना कोठे पाहता येणार

स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी तसेच disney plus hotstar वरदेखील हा सामना पाहता येईल.