यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन तूल्यबळ संघांत सामना होत आहे. सुरुवातीपासूनच या सामन्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान याने तीन बळी घेत अनोखा विक्रम रचला आहे.

हेही वाचा >>> केएल राहुलच्या जागेवर ऋषभ पंत? की दीपक हुडाला मिळणार संधी; हाँगकाँगविरोधात ‘अशी’ असेल टीम इंडिया

बांगलादेशने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशचा हा निर्णय काहीसा चुकीचा ठरला. कारण त्यांचे सलामीचे फलंदाज मोहम्मद नईम (६), अनामुल हक (५) स्वस्तात बाद झाले. विशेष म्हणजे या दोन्ही सलामीवीरांना मुजीबनेच बाद केले. या दोन बळींसह मुजीबने दुसऱ्या विकटेसाठी आलेल्या शकीब अल हसनलाही बाद केलं. हे तिन्ही बळी मुजीब उर रहमानने घेतले. त्यामुळे २४ धावांवर तीन गडी बाद अशी बिटक स्थिती बांगलादेशची झाली. या तीन बळीसंह मुजीबने एक अनोखा विक्रम नोंदवला. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २०० बळींचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा >>> भारताचा ‘हुकुमी एक्का’ परतणार का? दुखापतीतून सावरणाऱ्या बुमराहबद्दल BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

त्यानंतर राशीद खाननेही कमाल दाखवली. त्याने बांगलादेशच्या आणखी तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याने मुशफिकुर रहीम (१), अफिफ हुसैन (१२) यांना पायचित केलं. तसेच मैदानावर स्थिरावलेल्या महमुदुल्लाह यालादेखील राशीद खाननेच २५ धावांवर बाद केलं. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील फलंदाज बाद झाल्यामुळे बांगलादेश संघ खिळखिळा झाला. परिणामी २० षटकांत बांगलादेश फक्त १२७ धावाच करू शकला.