Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात याच दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार? तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> भारताचं बळ वाढणार! टी-२० विश्वचषकासाठी ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू परतणार

सुपर-४ फेरीमध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तानी संघापेक्षा सरस ठरला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानी संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर खास कामगिरी करू शकला नव्हता. आजच्या सामन्यात गोलंदाजी विभाग आणखी प्रबळ करण्याचा पाकिस्तानी संघ प्रयत्न करेल. भानुका राजपक्षे, दासून शनाका, कुसल मेंडिस पाथून निसंका या श्रीलंकेच्या स्फोटक फलंदाजांना रोखण्यासाठी पाकिस्तान नसीम शाहसारख्या आघाडीच्या गोलंदाजांचा संघात समावेश करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> उर्वशी रौतेलाचं पाकिस्तानी खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव; चर्चेला उधाण आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली “माझ्या…”

तर दुसरीकडे श्रीलंकेसमोर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान, वेगवान गोलंदाज नसीम शाह यांच्या रुपात मोठे आव्हान असेल. भारताविरोधात खेळताना नसीमने भेदक मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केला होतं. त्यामुळे नसीमला तोंड देण्यासाठी श्रीलंका आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>> Video : पाकिस्तानच्या खेळाडूने हे काय केलं ? प्रेक्षकांचे मोबाईल थेट खिशात घातले; पाहा नेमकं काय घडलं?

दरम्यान, पाकिस्तानी संघाचे दुबई हे होमग्राऊंड आहे. पाकिस्तानी खेळाडूंना या मैदानाची चांगली ओळख आहे. याचाच फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. तर आजच्या सामन्यातही आपली विजयी कामगिरी कायम राखण्यासाठी श्रीलंकेचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल.

श्रीलंका संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पाथुम निसांका, चरिथ असलंका, दानुष्का गुनाथिलका, दासून शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, जेफ्री वँडरसे, माहीश तिक्षाणा, मथिशा पाथिराना, दिलशान मधुशंका

हेही वाचा >>> उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी तिला…”

पाकिस्तान संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन