गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी पाकिस्तानला आशिया कपचे यजमानपद द्यायचे आहे, मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव हे केले आहे. भारताच्या या सुरक्षेच्या चिंतेवर माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादने असे विधान केले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद म्हणतो की, “टीम इंडियाने सुरक्षेची चिंता करू नये आणि पाकिस्तानात येऊन आशिया कप खेळावा. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळू शकत नसल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. यानंतर यूएई किंवा इंग्लंडमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भारताचे सामने होण्याची चर्चा आहे. त्याचवेळी, जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळला नाही, तर पाकिस्तानचा संघही विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप औपचारिकपणे काहीही सांगितले गेले नसले तरी. एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानचे विश्वचषक सामने कोलकाता आणि चेन्नई येथे खेळू शकतात.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

हेही वाचा: IPL 2023: दुधारी तलवार! डेव्हिड वॉर्नरच्या संथ फलंदाजीवर अक्षर पटेलचे सूचक विधान; म्हणाला, “माझी भूमिका…”

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने सर्वांना धक्कादायक विधान केले आहे. मियाँदादने नादिर अलीच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितले की, “भारताच्या दौऱ्यावर पाकिस्तानला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास वाटतो आणि आता या स्पर्धेसाठी पाकिस्तानात येण्याची भारताची पाळी आहे.

मियाँदाद म्हणाला, “सुरक्षेला विसरा. आमचा विश्वास आहे की जर मृत्यू यायचा असेल तर तो येतोच. मृत्यू अटळ आहे, भारतीय खेळाडू पाकिस्तानात आल्यावरच जीव गमावतील आणि इतर वेळी सुरक्षित राहतील असे थोडीच आहे. जीवन आणि मृत्यू अल्लाहच्या हातात आहे.” त्यांनी आज आम्हाला बोलावले तर आम्ही जाऊ. पण त्यांनी इथेही म्हणजेच पाकिस्तानात यायला हवे. मागच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो, पण तेव्हापासून ते इथे आलेच नाहीत. आता त्याची पाळी आहे, अल्लाहची मर्जी आहे की त्यांनी पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी यावे.”

“मग ‘नरकात जा’ असे विधान का केले गेले?” नादिरने जावेद मियाँदादला विचारले, “तुम्ही नुकतेच विधान केले होते की भारताला पाकिस्तानचा दौरा करायचा नसेल तर नरकात जावे?” या प्रश्नावर मियाँदाद नादिरला म्हणाला, “अजून काय करू, सांग… पंजाबीत म्हणतात, खड्यात जा, मातीत जा… संपवा.” जावेद एवढ्यावरच थांबला नाही आणि म्हणाला की, “पाकिस्तानचे क्रिकेट हे अव्वल दर्जाचे मानले जाते. पाकिस्तान क्रिकेटमध्ये भारतापेक्षा खूप पुढे आहे.”

हेही वाचा: Shoaib Akhtar: अरे वाह! वयाच्या १००व्या वर्षी १०० MPHने बॉलिंग करणाऱ्या म्हाताऱ्याच्या शोधात शोएब अख्तर, पाहा Video

२०१२ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. यापूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने बीसीसीआयला त्यांच्या निर्णयाबद्दल ‘अहंकारी’ म्हटले होते आणि भारत सरकारवर ‘हुकूमशहा’सारखे वागल्याचा आरोपही केला होता. तो म्हणाला की, “पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध हे एक दुःखद आणि दुर्दैवी प्रकरण आहे. क्रिकेट जगतातील एक महासत्ता म्हणून भारत आता ज्या पद्धतीने वागतो आहे त्यामध्ये खूप अहंकार आहे. भरपूर पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ते आता दुसऱ्यांना झिडकारत आहेत. एक महासत्ता, त्यांनी कोणाला खेळावे आणि कोणाला नाही हे ते जवळजवळ ठरवतात. ही क्रिकेटसाठी लाजिरवाणी बाब आहे.”