यजमान भारताचा रविवारी महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत चायनीज तैपेईशी सामना होणार असून पहिला सामन्यातील बरोबरीनंतर त्यांना विजय अनिवार्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी सलामीला भारताला इराणने गोलशून्य बरोबरीत रोखले, तर दुसरीकडे तैपेईवर आठ वेळा विजेत्या चीनने ०-४ अशी मात केली. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास भारताला ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश लाभेल. तैपेईवरील विजयासह भारतीय संघाचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup football tournament challenge of chinese taipei before india today akp
First published on: 23-01-2022 at 00:05 IST