scorecardresearch

आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारत-चायनीज तैपेई सामना रद्द

‘‘भारतीय संघातील अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.

यजमान संघाचे १२ फुटबॉलपटू करोनाबाधित

नवी मुंबई : भारतीय संघातील १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे ‘एएफसी’ महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेमधील चायनीज तैपेईविरुद्ध रविवारी होणारा सामना रद्द करण्यात आला.

‘‘भारतीय संघातील अनेक खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. याचप्रमाणे दोन खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. अ-गटातील चायनीज तैपेईविरुद्धचा सामना खेळण्यासाठी आवश्यक किमान १३ तंदुरुस्त खेळाडूंच्या निकषाची पूर्तता करण्यात भारत अपयशी ठरला,’’ असे आशियाई फुटबॉल महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे. स्पर्धेला प्रारंभ होण्याआधी भारतीय संघातील दोन खेळाडू करोनाबाधित झाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia cup football tournament indo chinese taipei match cancelled akp

ताज्या बातम्या