आशिया चषक हॉकी स्पर्धा : तिसऱ्या स्थानासाठी आज भारताची चीनशी लढत

भारताने सुरुवात चांगली केली. २८व्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

मस्कत : आशिया चषकाचे जेतेपद टिकवण्यात भारतीय महिला संघ बुधवारी अपयशी ठरला. पिछाडीवरून दिमाखदार मुसंडीसह कोरियाने भारताला ३-२ अशी धूळ चारली. आता शुक्रवारी तिसऱ्या स्थानासाठी भारताला चीनविरुद्ध लढावे लागणार आहे.

भारताने सुरुवात चांगली केली. २८व्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर मात्र कोरियाचे वर्चस्व दिसून आले. कर्णधार ईनुबी चेऑन (३१व्या मिनिटाला), सेऊंग जू ली (४५व्या) आणि हायेजिन चो (४७व्या) यांनी कोरियाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना लालरेमसियामिन वंदनाच्या साहाय्याने भारताच्या खात्यावर दुसऱ्या गोलची नोंद केली. परंतु त्यानंतर भारताला तिसरा गोल साकारता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia cup hockey tournament india fight china for third place today akp

Next Story
रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची ‘बीसीसीआय’ची योजना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी