मस्कत : आशिया चषकाचे जेतेपद टिकवण्यात भारतीय महिला संघ बुधवारी अपयशी ठरला. पिछाडीवरून दिमाखदार मुसंडीसह कोरियाने भारताला ३-२ अशी धूळ चारली. आता शुक्रवारी तिसऱ्या स्थानासाठी भारताला चीनविरुद्ध लढावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने सुरुवात चांगली केली. २८व्या मिनिटाला वंदना कटारियाने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर मात्र कोरियाचे वर्चस्व दिसून आले. कर्णधार ईनुबी चेऑन (३१व्या मिनिटाला), सेऊंग जू ली (४५व्या) आणि हायेजिन चो (४७व्या) यांनी कोरियाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला सहा मिनिटे शिल्लक असताना लालरेमसियामिन वंदनाच्या साहाय्याने भारताच्या खात्यावर दुसऱ्या गोलची नोंद केली. परंतु त्यानंतर भारताला तिसरा गोल साकारता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup hockey tournament india fight china for third place today akp
First published on: 28-01-2022 at 00:47 IST