मस्कत : गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा ९-० असा धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणाऱ्या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. भारताकडून वंदना कटारिया (८ आणि ३४वे मिनिट), नवनीत कौर (१५ आणि २७वे मि.), शर्मिला (४६ आणि ५९वे मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर दीप ग्रेस एक्का (१०वे मि.), लालरेमसिआमी (३८वे मि.) आणि मोनिका (४०वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup hockey tournament indian team a strong start to the asia cup women hockey tournament akp
First published on: 23-01-2022 at 00:05 IST