आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा : भारताला दोन रौप्य

पुरुष रीकर्व्ह सांघिक गटात कपिल, प्रवीण जाधव आणि पार्थ साळुंखे यांनी कोरियाविरुद्ध २-६ अशी हार पत्करली. कोरियाच्या संघात ली सेऊंगयुन, किम पिल-जूंग आणि हॅन वू टॅक यांचा समावेश आहे.

स्पर्धेत एकूण सात पदकांची कमाई

ढाका : भारतीय तिरंदाज बलाढ्य कोरियाचा अडथळा ओलांडण्यात पुन्हा अपयशी ठरले. आशियाई तिरंदाजी र्अंजक्यपद स्पर्धेच्या पुरुष आणि महिला सांघिक गटाचे अंतिम सामने शुक्रवारी गमावल्यामुळे दोन रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले.

पुरुष रीकर्व्ह सांघिक गटात कपिल, प्रवीण जाधव आणि पार्थ साळुंखे यांनी कोरियाविरुद्ध २-६ अशी हार पत्करली. कोरियाच्या संघात ली सेऊंगयुन, किम पिल-जूंग आणि हॅन वू टॅक यांचा समावेश आहे.

अंकिता भाकट, मधून वेदवान आणि रिद्धी यांचा समावेश असलेल्या महिला रीकर्व्ह संघाने कोरियापुढे ०-६ अशी शरणागती पत्करली. कोरियाच्या संघात रायू सू जंग, ओ येजिन आणि लिम हाईजिन यांचा समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asian championship archery two silver medal india akp

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या