विश्वविजेती वेटलिफ्टर्स मिराबाई चानूची आशियाई खेळांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मीराबाईकडून भारताला यंदाच्या आशियाई खेळांमध्ये पदकाची अपेक्षा आहे. मीराबाई ४८ किलो वजनी गटात लढणार असून राखी हलदार ६३ किलो वजनी गटात उतरणार आहे.

पुरुषांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना यंदाच्या संघात जागा मिळालेली आहे. सतिश शिवलींगम, अजय सिंह आणि विकास ठाकूर या तीन वेटलिफ्टर्सना भारतीय संघात जागा मिळालेली आहे. २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारताने ६ जणांचा संघ उतरवला होता, मात्र एकाही वेटलिफ्टरला पदकाची कमाई करता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताचे वेटलिफ्टर्स पदक मिळवून देतात का हे पहावं लागणार आहे.

असा असेल भारताचा वेटलिफ्टर्सचा संघ –

महिला – मीराबाई चानू (४८ किलो वजनी गट), राखी हालदार (६३ किलो वजनी गट)

पुरुष – सतीश कुमार शिवलींगम आणि अजय सिंह (७७ किलो वजनी गट), विकास ठाकूर (९४ किलो वजनी गट)