scorecardresearch

Premium

Asian Games 2018 : द्युती चंदला ओडीशा सरकारकडून १.५ कोटींचं बक्षिस

द्युतीवर कौतुकाचा वर्षाव

१०० मी. शर्यतीपाठोपाठ द्युती चंदची २०० मी. शर्यतीत रौप्यपदकाची कमाई
१०० मी. शर्यतीपाठोपाठ द्युती चंदची २०० मी. शर्यतीत रौप्यपदकाची कमाई

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ओडीशा सरकारने द्युतीच्या या कामगिरीसाठी १.५ कोटींचं इनाम घोषित केलं. द्युनीतेन १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरं स्थान कमावत रौप्य पदकाची कमाई केली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने द्युतीचं सुवर्णपदक हुकलं. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चंदला बक्षिसाची घोषणा केली आहे. याचसोबत ओडीशा ऑलिम्पिक असोसिएशननेही द्युतीला ५० हजाराचं बक्षिस जाहीर केलं आहे.

“द्युतीने केलेल्या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सरावाला आवश्यक त्या सर्व सुविधा द्युतीला उपलब्ध करुन देणात येणार आहेत.” मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात द्युतीचं कौतुक करण्यात आलं आहे. याचसोबत अनेक मान्यवर व्यक्तींनी द्युतीचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2018 silver medallist dutee chand awarded rs 1 5 crore by odisha government

First published on: 27-08-2018 at 16:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×