Asian Games 2023: जकार्ता येथे २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारतीय ऍथलीट स्वप्ना बर्मन,ही चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या गेम्समध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखण्यात अपयशी ठरली. मात्र या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी स्वप्नाच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. स्वप्नाने आपल्या पराभवावरच आक्षेप घेत ट्रान्सजेंडर महिला स्पर्धकामुळे हेप्टॅथलॉनमध्ये पदक गमावण्याबद्दल भाष्य केलं आहे.
जकार्ता येथील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर यावेळेस स्वप्नाकडून विजयाची अपेक्षा होती. मात्र स्पर्धेदरम्यानच झालेली दुखापत आणि शेवटच्या क्षणी चुकलेला नेमकं यामुळे स्वप्नाचे स्वप्न भंग झाले होते. २७ वर्षीय स्वप्नाच्या नावावर भालाफेकमध्ये ५३.५५ मीटर भालाफेकीचा वैयक्तिक सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत तिला केवळ ४५. १३ मीटर लांबीच गाठता आली. या रेकॉर्डसह महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत ५७०८ गुणांसह स्वप्ना रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावरच राहिली. अवघ्या चार पॉईंटच्या कमतरतेने तिने कांस्य-पदक पटकावण्याची संधी गमावली.
दुसरीकडे ५७१२ पॉईंट्सने नंदिनी अगासराने तिसऱ्या स्थानी येऊन कांस्य पदक पटकावले. यावरून स्वप्नाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेकी , एका ट्रान्सजेंडर महिलेमुळे मी पदक गमावले आहे. स्वप्ननाने कोणाचेही नाव लिहिले नसले तरीही तिचा रोष कोणाकडे याविषयी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वप्नाने असे लिहिले की, “चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एका ट्रान्सजेंडर महिलेमुळे मी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक गमावले आहे. मला माझं पदक परत हवं आहे कारण हे ऍथलेटिक्सच्या नियमांविरुद्ध आहे. कृपया मला मदत करा आणि मला पाठिंबा द्या. #protestforfairplay. “
ही पोस्ट केल्यावर काहीच तासात स्वप्नाने ही पोस्ट डिलीट केली होती.
हे ही वाचा<< पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”
दरम्यान या स्पर्धेत, चीनच्या नानाली झेंगने तब्बल ६१४९ गुणांसह सुवर्णपदकावर दावा केला, तर उझबेकिस्तानच्या एकातेरिना वोरोनिनाने ६०५६ गुणांसह रौप्यपदक पटकावले आहे.